
उत्तम गुणवत्ता आणि अतूट विश्वासासाठी चॉइस ग्रुपने सर्व स्तरांवर नावलौकिक मिळवला आहे. धानोरी, लोहेगाव, विमान नगर, केशव नगर यांसारख्या ठिकाणी घर किंवा व्यावसायिक मालमत्ता घेण्यासाठी चॉईस ग्रुपला सर्वांची पहिली पसंती आहे. गेल्या २५ वर्षांपासून आम्ही आनंदी आयुष्यासोबत एक अतूट विश्वास निर्माण करीत आहोत. आमच्या आदरणीय ग्राहकांना उत्तम घर आणि त्यांच्या पैशांचा उत्तम मोबदला देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून जागतिक स्तरावरील तंत्राची अंमलबजावणी केल्याने आमच्या प्रकल्पांची रचना केवळ आश्चर्यचकित करणारे लक्झरियस डिझाईन नसून श्रेष्ठ गुणवत्ता व सौंदर्यदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे.
आमचे सर्व संचालक उच्च शिक्षित व सिव्हिल इंजिनीरिंग व बांधकाम क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक आहेत.
सातत्यपूर्ण उत्तम कामासाठी आम्हाला वेगवेगळ्या नामांकित संस्थांकडून वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने आम्हाला “वेल बिल्ट स्ट्रक्चर अवॉर्ड” ने सन्मानित केले आहे. चॉइस ग्रुप ही ISO 9001:2015 प्रमाणित संस्था आहे.